हप्ता दिला नाही म्हणत अपंग पाणी विक्रेत्याला आरपीएफ जवानांकडून बेदम मारहाण

शहापूरमध्ये राहणारा सिद्धार्थ साहू हा 20 वर्षीय तरुण एका हाताने अपंग आहे.

ठाणे | लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीत पाणी विकणाऱ्या एका अपंग तरुणाला पैशासाठी आरपीएफ बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपीने पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे आरपीएफ जवानांची दादागिरी पुन्हा एका समोर आली आहे.

शहापूरमध्ये राहणारा सिद्धार्थ साहू हा 20 वर्षीय तरुण एका हाताने अपंग आहे. तो निराधार आहे. स्टेशनवर पाणी विक्री करुन स्वत: पोट भरतो. कल्याण आणि कसारा दरम्यान गोदान एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना पाणी विकत असताना दोन आरपीएफ जवानांनी त्याला पाहिले. सिद्धार्थचा आरोप आहे की, आरपीएफच्या एका जवानाने त्याच्याकडून पैशाची मागणी केली. इतर फेरीवाल्यांप्रमाणो त्यालाही पैसे द्यावे लागतील असे आरपीएफ जवानाचे म्हणणे होते. सिद्धार्थने पुढच्या स्टेशनवर पैशे देतो असे सांगितले. मात्र आरपीएफ त्याचे काही एक ऐकून घेण्यास तयार नव्हते. अखेर कसारा स्थानकात ट्रेन पोहचल्यानंतर आरपीएफचे दोन जवान सिद्धार्थला एका मालगाडीच्या मागे घेऊन गेले. त्याठिकाणी त्याला मारहाण करणयत आली. मारहाणीचा व्हिडिओ काही नागरिक काढत होते. हे पाहून आरपीएफच्या कमांडोने सिद्धार्थला मारहाण करणे थांबविले. त्याला सोडून दिले. सिद्धार्थ याला गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी कल्याण जीआरपीकडे सिद्धार्थ याने तक्रार केली असून जीआरपीने चौकशी सुरु केली आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल असा कल्याण जीआरपीचे म्हणणो आहे. मात्र या घटनेमुळे परत एकदा आरपीएपची दादागिरी समोर आली आहे. या प्रकरणी आरपीएफने सुद्धा सिद्धार्थ विरोधात मारहाणीची तक्रार केली आहे. सिद्धार्थ जर अवैधपणे गाडीत पाणी विक्री करीत होता. तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाणे अपेक्षित होते. मात्र त्याला बेदम मारहाण करणे. त्याच्याकडे पैशाची मागणी करणे हे कोणत्या कायद्यात बसते असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे. AM News Developed by Kalavati Technologies