गुजराती आणि मराठी व्यक्तींच्या भांडणामध्ये मनसेची उडी, गुजराती व्यक्तीला शिकवला धडा

राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मुंबई | ठाण्यामधील नौपाडा येथे एका सोसायटीतील दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. मराठी विरुद्ध गुजराती असा हा वाद निर्माण झाला. राहुल पैठणकर आणि हसमुख शहा अशी या दोन्ही व्यक्तींची नावे आहेत. या दोघांचे भांडण पोलिसांपर्यंत गेले. या दोघांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांनीही एकमेकांना शिविगाळ केली असून मारहाण केली असल्याचे सांगितले. आता या दोघांच्या भांडणामध्ये मनसेने उडी घेतली आहे. मराठी माणसावर हात कसा उचलला म्हणत मनसेने गुजराती व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ फेसबूकवर सध्या व्हायरल होत आहे.

राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मराठी विरुद्ध गुजराती असा वाद रंगला. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या व्हिडीओची दखल घेतली. यानंतर त्यांनी हसमुख शाह भेटला तर त्याला मारल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर त्यांनी हसमुख शाहची भेट घेतली आणि त्याला माफी मागायला लावणारा व्हिडिओ फेसबूकवर केला आहे. व्हिडीओमध्ये अविनाश जाधव हे हसमुख शाहला आम्ही अद्दल घडवू असे म्हणतं आहेत. तसेच त्यांनी या हसमुख शाहला मराठी माणसाला दुखावल्यामुळे जाहीर माफी मागायला लावत आहेत. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मान ठेवलाच पाहिजे अविनाश जाधव यांनी ठणकावून सांगितलं आहे. तसंच 'राज ठाकरेंनी मला कॅमेऱ्यासमोर शिवी देऊ नको आणि मारहाण करु नको असा आदेश दिला आहे. कॅमेरा बंद झाल्यानंतर जे काही करायचं आहे ते मी करणार आहे. आता कॅमेरा बंद झाल्यावर मला काय कराययं ते मी करणारच असल्याचे ते म्हणत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies