पुण्यात डेंग्यू आजाराचे थैमान, सप्टेंबर महिन्यात 465 डेंग्यू रुग्ण

अवकाळी पावसामुळे पुणे शहरात अस्वच्छता आणि घाणीच साम्राज्य वाढलं आहे

पुणे । पुण्यात पुन्हा एकदा डेंग्यू या आजाराचं थैमान वाढू लागलं आहे, आधीच पुण्यात स्वाईन फ्ल्यूसारखी साथ सुरु असताना, त्यात आता पुणेकरांवर डेंग्यूचा धोका ही वाढू लागलाय. अवकाळी पावसाळ्यामूळे होणारी घाण आणि हवामानात होणाऱ्या सततच्या बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णात पुणे शहरात झपाट्याने वाढ झाली आहे.

पुणे शहरातील वेगवगेळ्या रुग्णालयामध्ये सप्टेंबर महिन्यात जवळपास 465 डेंगू या आजाराने ग्रस्त रुग्ण दाखल झालेत. डेंग्यूच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी पुणे महापालिकेच्या प्रत्येक हॉस्पिल मध्ये औषधाचा मुबलक साठा करून ठेवण्यात आला आहे. या आजराची लक्षणे दिसताच जवळच्या पालिकेच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन तपासणी करून औषध घ्यावी असं आव्हान पुणे महापलिकेच्या आरोग्य विभागाने केलं आहे. त्याच बरोबर डेंग्यूच्या साथीवर मात करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता, पाणी पुरवठा आणि आरोग्य हे तिन्ही विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितल.

अवकाळी पावसामुळे पुणे शहरात अस्वच्छता आणि घाणीच साम्राज्य वाढलं आहे. त्यामुळे शहरात हा आजार आणखी झपाट्याने पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आपण पुरेशी काळजी घेतली तर स्वतःला आणि आपल्या कुटूंबाला या आजरा पासून लांब ठेवू शकतोAM News Developed by Kalavati Technologies