आसाममध्ये सोशल डिस्टन्सींग फज्जा, आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजारांचा जमाव

नागाव जिल्ह्यात अंत्यसंस्कारासाठी तब्बल दहा हजार लोकं उपस्थित, प्रशासनाला माहिती मिळताच जवळील तीन गाव सील

आसाम । भारतावरील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना आसाममध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसाममधील नागाव जिल्ह्यात १० हजारांच्या संख्येनी लोकं एकत्र उपस्थित राहिली. यामुळे आसाममधील तीन गावांत शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागाव जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरू आणि आमदार अमीनूल इस्लाम यांचे वडील खैरूल इस्लाम यांच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल दहा हजार लोकं उपस्थित होते. ८७ वर्षांचे खैरूल इस्लाम यांच्यावर २ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधीला दहा हजार लोकं उपस्थित होते. प्रशासनाला माहिती मिळताच जवळील तीन गाव सील करण्यात आली. खैरुल इस्लाम यांचा मुलगा आणि धींग येथील आमदार अमीनुल इस्लाम यांनी वडिलांच्या अंत्यविधीचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक हजर असल्याचे दिसत आहे.
नागाव जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार, अंत्यविधीसाठी कमीत कमी दहा हजार जणांची उपस्थिती होती. संदर्भात पोलिसांनी दोन गुन्हे देखील दाखल केले आहेत. या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या लोकांनी लॉकडाऊनच्या काळातील कोणतेही नियम पाळलेले नाहीत. सोशल डिस्टन्सींगचा येथे फज्जा उडाला आहे. दरम्यान आमदार यांनी 'माझे वडील खैरूल इस्लाम हे अतिशय ख्यातनाम व्यक्ती होते. त्यांच्या अनुयायांची संख्याही मोठी आहे. खैरूल इस्लाम यांच्या निधनाची बातमी आम्ही प्रशासनाला तात्काळ दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधीची व्यवस्था करावी असे आम्ही सांगितले होते.AM News Developed by Kalavati Technologies