बॉलिवूड विश्व पुन्हा हादरलं! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या

टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मानं बुधवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई | एकीकडे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूड विश्व सावरतच असतांना आता आणखी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यानं आत्महत्या केली आहे. टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मानं बुधवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. मालाड येथे राहत असलेल्या समीरचा मृतदेह किचनमधील असलेल्या फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला आहे.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरनं मालाडमधील घरं फ्रेबुवारीमध्ये भाडे तत्वावर घेतले होते. बुधवारी रात्री इमारतीच्या वॉचमननं समीरचा मृतदेह पाहिला आणि त्याच्या शेजाऱ्यांना याबाबत कळवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीरनं दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी. अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. समीरनं प्रसिद्ध मालिका कहानी घर घर की, क्यू की सांस भी कभी बहू थी, 'ये रिश्ते है प्यार के', 'कहानी घर घर की', 'लेफ़्ट राइट लेफ़्ट', 'इस प्यार को क्या नाम दूं' अशा मालिकांमध्ये काम केले होते.AM News Developed by Kalavati Technologies