एन्काउंटर झालेल्या आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश

एन्काउंटर प्रकरणाची चौकशी सुरू

हैदराबाद | पशुवैद्यक डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आलं होतं. यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली. या प्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होती. दरम्यान चौकशी सुरू असतानाच नराधमांचा हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर करत खात्मा केला. मात्र, आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. या घटनेत ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. 

तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार केलेल्या चारही आरोपींचा खात्मा झाला. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यानंतर त्यांनी पोलिसांच्या बंदुकाही हिसकावल्या. तेव्हा पोलिसांना स्वतःच्या बचावासाठी गोळीबार करावा लागला. यामध्ये ते चौघेही ठार झाले असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. देशभरातून या घटनेचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. मात्र काहींनी या घटनेचा विरोधही केला आहे. आता याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यामुळे मृतदेह 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत.AM News Developed by Kalavati Technologies