वर्धा । वर्धा जिल्ह्यातील तांभारी येथील वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते साहिल ढोके (वय 25) यांचा तांभारी शिवारातील कॅनलमध्ये संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. साहिल रविवारी त्याचा मित्र मंगेश ठाकरे (वय 26) राहणार खंडाळाव याच्या सोबत दुचाकीवर बसुन शेतात काम करण्यासाठी गेला होता. मात्र तो परत आला नसल्याने या संबंधी समुद्रपुर पोलिसांना माहिती देण्यात आली होती.
पोलिसांनी साहिलचा शोध घेतला असता त्याचा शोध लागला नाही. पोलिसांनी पुन्हा सोमवारी साहिलचा शोध घेतला असता, साहिलचा मृतदेह तांभारी शिवारातील कॅनलमध्ये आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला. त्याच्यासोबत घातपात तर झाला नाही ना? अशी चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे. यासंबधी पुढील तपास समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.