सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

बिहार सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य; आत्महत्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी होणार

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जून महिन्यात मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आत्महत्या का केली याचा तपास करत असतांना बिहार पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आता या प्रकरणाला वेगवेगळी वळण मिळू लागली आहे. सुशांत सिंह याच्या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. अखेर त्यांची हि मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies