महानायक बिगबी ची प्रकृती स्थिर, आइसोलेशन वार्डात उपचार सुरु

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची हल्की लक्षणे

मुंबई । कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचं नानावटी रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना रुग्णालयाच्या आइसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेऊन आहे. बच्चन यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितले आहे की, माझ्या प्रकृतीबाबत सतत ट्विटरद्वारे माहिती देत रहा. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की, अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची हल्की लक्षणे आहेत. तसेच सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

11 जुलै रोजी अमिताभ बच्चन यांनी कोरोना झाल्याचे आपल्या ट्वीट द्वारे कळविले होते. ज्या भागात बच्चन कुटूंब वास्तव्यास आहे, त्याठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहे.AM News Developed by Kalavati Technologies