बलात्कार प्रकरणातील संशयिताची आत्महत्या; भांगसीमाता गडावर तरुणीवर बलात्कार केल्याचा होता आरोप

वाळूज महानगर परिसरातील; खवड्या डोंगरावरुन उडी मारून संपवली जीवनयात्रा

औरंगाबाद । दोन दिवसांपूर्वी भांगसीमाता गडावर 20 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या संशयित आरोपीने गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खवड्या डोंगरावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. रावसाहेब भाऊसाहेब माळी असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या भांगसीमाता गडावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर बलात्कार करण्यात आला होता. त्याचा आरोप सदरील व्यक्तीवर लावण्यात आला होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रावसाहेब डोंगरावर पळत असल्याचे त्याचा भावाने सांगितले. तसेच त्यांच्या भावाने त्याला पोलिसांना शरण येण्याची विनंती देखील केली होती. परंतु न जुमानता त्याने डोंगरावरून उडी मारत आपले जीवन संपवले. त्याच्यावर यापुर्वीही एक बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पोलीस वारंवार त्रास देत असल्याचे मयताचा भाऊ रमेश माळी यानी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies