पालघरमध्ये शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्या

मोखाडा तालुक्यातील हिरवे शासकीय आश्रमशाळेतील घटना

पालघर |  मोखाडा तालुक्यातील हिरवे शासकीय आश्रमशाळेतील 9 वी मध्ये शिकणाऱ्या सुनिल चंदर खांडगी ( 15 ) या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मोखाडा तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटना रविवारी संध्याकाळी घडली. या घटनेने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नसून मोखाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies