वर्धा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची आत्महत्या

वर्धा | वर्ध्याच्या जिल्हा कारागृहात खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मध्यरात्री तुरुंगात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
 माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्याच्या मूळचा उमरखेड तालुक्यातील असलेला गोपीचंद रामचंद्र डहाके हा 38 वर्षीय कैदी दीड वर्षांपासून वर्ध्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. नैराशेतून त्याने आत्महत्या केली असल्याची बाब समोर आली आहे.

मृत कैद्याने यवतमाळ, अमरावती येथे कारागृहात शिक्षा भोगली असल्याची माहिती आहे. प्यारोलवर सुटल्यावर त्याच्या कारागृहातील गैरहजेरीमुळे त्याला पुन्हा प्यारोलवर सुटी मिळणार नव्हती. त्यामुळे त्याने नैराशेतून आत्महत्या केली असल्याची बाब समोर आली आहे. वर्धा शहरात या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies