सिंधुदुर्ग | मालाडहून आलेल्या क्वॉरंटाईन युवकाचा अचानक मृत्यू, परिसरात खळबळ

या युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्यापही अस्पष्ट आहे

सिंधुदुर्ग | मालाडहुन सावंतवाडी गुळदुवे येथे आलेल्या युवकाचा आज सकाळी अचानक मृत्यू झाला आहे. मालाडहून भाड्याची गाडी करुन हा युवक मंगळवारी गावी आला होता. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन त्याला क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगी सुद्धा होती. आज सकाळी सदरील युवकाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं उपचारासाठी शिरोडा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतांना या युवकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा युवक मुंबईहुन आल्यानंतर तपासणी करिता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी आला असल्याने हे आरोग्य केंद्र आज ठेवण्यात बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ ठाकूर यांना दिल्या आहे. तसेच आरोग्य केंद्र पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. ठाकूर यांनी माहिती दिली आहे. मृत युवकाची कोरोना तपासणी करण्यात येणार असून त्याचे स्वॅब घेण्यात आले आहे. तसेच
सदरील युवकाच्या संपर्कात असलेल्या 6 व्यक्तींना सावंतवाडी येथे क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies