गडचिरोली | गुडवालाला लागून असलेल्या पोटफोडी नदीत पोटेगाव येथून प्रवाशांना नेणारी टाटा सुमो वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन व पोलिस विभागाचे अधिकारी वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने सुमोमध्ये अडकलेल्या 10 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
बचावाच्या कामासाठी बोटींसह अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी टाटा सुमोने 10 प्रवाशांना पोटेगावहून गडचिरोलीकडे नेले. वाटेतच पोटफोडी नदीच्या पुलाजवळ पोहोचताच सुमो नदीत पलटी झाली. या घटनेची माहिती सुमोमधील काही प्रवाशांनी गडचिरोली पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच तहसीलदार गणवीर यांच्या नेतृत्वात एस.एच.ओ. प्रदीप चौगावकर यांनी तातडीने दिलासा दिला. पोलिस विभागाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने पोटफोडी नदी गाठली आणि सुमोमधील सर्व 10 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. पोटेगाव येथील रहिवासी नरेंद्र मोहुर्ले, योगेश सुर्पम, स्वप्नील सुरपम, सुरेश वाटगुरे, स्वप्निल चव्हाण, मोहन भोयर, अर्जुन पोवार, रोशन गुरनुले, मंदा चौधरी आणि सोनूले या प्रवशांना सुखरूप वाचविण्यात आले. बचावकार्यासाठी तहसीलदार गणवीर, ठाणेदार चौगणकर यांच्यासह महसूल प्रशासनासह व पोलिस विभागाच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.