परभणीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

जिल्ह्यात 15 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहे

परभणी । परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 15 जुलैपर्यंत जिल्हाभरात संचारबंदी लागू केली आहे. या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीसही जागोजागी तैनात करण्यात आले आहेत.
परभणी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे.

परभणी शहरातील रायगड कॉर्नर, अपणा चौक, शिवाजी पुतळा, स्टेशनरोड या भागासह वसमत रोड परिसरात देखील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त केली जात असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies