शेतकऱ्यांकडून अवैध वसुली थांबवा, शेतकरी संघटनेकडून नगरपरिषद समोर "डफडे बजाव" आंदोलन

नगर परिषद कडून होतेय भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून सक्तीची वसूली

बुलडाणा । बुलडाणा जिल्ह्यतील चिखली नगर परिषद भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून अवैधपणे सक्तीची वसुली करत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने आज चिखली नगरपरिषदेवर शेतकऱ्यांसह मोर्चा काढून नगर परिषद समोर डफडे बजाव आंदोलन केलं. चिखली शहरात मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी आपला भाजीपाला विक्री साठी आणतात. मात्र, जागेअभावी शेतकरी मिळेल त्या ठिकाणी बसून आपला भाजीपाला विकतात. मात्र ज्याठिकाणी नगर परिषदची हररासीची जागा नाही, त्याठिकानावरून ही नगर परिषद कर्मचारी बैठक या नावाखाली शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करतात. याला शेतकऱ्यांनी विरोध केला असून यापूर्वीही शेतकऱ्यांनी नगर परिषदेला सांगितले होते. मात्र, नगरपरिषदने वसुली थांबवली नाही आणि वसुली चालूच ठेवली. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात नगरपरिषद समोर डफडे बजाव आंदोलन केलं. आणि नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन वसुली थांबवावी, अन्यथा शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies