कळस चोरी प्रकरणाचा दोन तासात छडा, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिरुर पोलिसांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत कळस चोरीचा प्रकरणाचा छडा लावत आरोपीस अटक केली आहे.

पुणे | शिरुर तालुक्यातील शिरुर शहरानजीक डोंगरावर असलेल्या रेणुकामाता मंदिराचा कळस चोरी गेल्याची घटना घडली असून शिरुर पोलिसांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत कळस चोरीचा प्रकरणाचा छडा लावत आरोपीस अटक केली आहे. प्रशांत आबा म्हस्के (रा.बाबुरावनगर,शिरुर) असे कळस चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर शहरानजीक डोंगरावर असलेल्या रेणुकामाता मंदिराचा कळस गुरुवार (दि.6) रोजी राञीच्या सुमारास चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत शिरुर पोलिसांना माहिती मिळाताच घटनेचे गांभिर्य लक्षात घेत शिरुर पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी वेगाने सुञे हलवत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिकांनी सदर आरोपीस हटकले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी प्रशांत याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीकडे अंदाजे 4 ते 5 किलो वजनाचा पंचधातुचा सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा चोरी केलेला कळस मिळुन आला. शिरुर पोलिस स्टेशनला चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.  

सदर कामगिरी पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस नाईक संजु जाधव, राजेंद्र गोपाळे, संतोष साळुंके, गोरक्षनाथ शिंदे, संतोष साठे, राहुल भागवत यांच्या पथकाने केली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies