राज्य सरकारने पंचनामे करण्यात वेळ वाया घालू नये, शेतकऱ्यांच्या तात्काळ मदत करावी - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता, सरकारने तात्काळ मदत जाहीर करावे अशी मागणी खासदार प्रतापराव पाटीलांनी केली आहे

नांदेड । लोहा तालुक्याचे भूमिपुत्र नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते लोहा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. लोहा येथील मार्केट कमिटी मैदानात चिखलीकर यांचे लोह्याच्या परंपरेनुसार खारीक आणि खोबरं यांचा हार घालून भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रताप पाटील यांनी सांगितले की, परतीच्या पावसाने कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे. म्हणून शासनाने पंचनामे करण्यात वेळ न घालवता लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली.

सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची असेल तरच आणेवारी 50% टक्केच्या खाली दाखवली जाईल. अन्यथा आणेवारी वर दाखवून मदत नाकारली जाईल. असा आरोप खासदार चिखलीकर यांनी सरकारवर केला आहे. अजित पवार यांनी सत्तेत नसताना शेतकऱ्यांना देण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. आता त्यांनीच शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी. तिजोरीची चावी त्यांच्याकडे आहे. या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा असा खोचक टोला चिखलीकर यांनी अजित दादा पवार यांना लगावला.AM News Developed by Kalavati Technologies