बीड | लॉकडाऊनमुळे एसटी बसेस बंद, चालकावर हमालीची वेळ

कुटुंबाचा उदर्निवाह करण्यासाठी गेवराई आगाराचा चालक बनला हमाल

बीड |  संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचे संकट असल्याने राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची लोकवाहीनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी गेल्या कित्येक दिवसांपून रस्त्यावर उतरली नाही. काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाची धास्ती धरून बसलेल्या प्रवाशांनी प्रवासाकडे पाठ फिरवली. परिणामी कमी उत्पन्न मिळत असल्याने या बसेसही बंद कराव्या लागल्या आहे. यामुळे एसटी कामगारांसह त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना हाती येईल ते काम करावे लागत आहे.

हेही वाचा... आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

अशीच व्यथा बीडच्या बागपिंपळगाव येथील अनिल कोकरे यांची आहे. अनिल हे मागील काही वर्षांपासून बीड विभागाच्या गेवराई आगारामध्ये चालक म्हणून काम करतात. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव अधिक होत असल्यामुळे संपूर्ण बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आणि हातातले काम बंद पडले. त्यात गेल्या चार महिन्यांपासून पगार नसल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह करण्यासाठी अनिल कोकरे यांच्यावर चक्क जिनींग वर हमाली करण्याची वेळ आली आहे. दररोज हमाली करुन जे काही रोजंदारी तत्वावर त्यांना पैसे मिळतात त्या पैशांवर कोकरे आपले कुटुंबाचा गाडा चालवत आहे. आज कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बुडाले आहेत. अनेकांच्या हातचे काम गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक चणचण भासू लागल्याने सरकारने आता खरंच एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष देण्याची गरज आहे.AM News Developed by Kalavati Technologies