SSC RESULT : दहावीचा निकाल जाहीर; 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल जाहीर झाला आहे.
राज्यात एकूण 15 लाख 84 हजार 264 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यातून 15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे.

यावर्षीच्या निकालात बारावी आणि दहावीतही कोकण विभागाने बाजी मारली असुन कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के लागला आहे. तर बारावीत आणि दहावीत सुद्धा औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असुन औरंगाबादचा निकाल 92 टक्के लागला आहे.


विभागनिहाय टक्केवारी अशी

पुणे - 97.34 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
कोकण - 98.77 टक्के

कसा पाहाल निकाल?

दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावर जा.

त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.AM News Developed by Kalavati Technologies