नांदेड शहरात सूक्ष्म जिवाणू रोधक औषध फवारणी; कर्मचाऱ्यांचे बेहाल

प्रशासनाने ह्या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत कार्यवाही करावी

नांदेड | कोरोनाच्या धर्तीवर उपाययोजना म्हणून अर्धापूर शहरात शूष्म जिवाणू रोधक औषध फवारणी नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीच सुविधा देण्यात आली नाही. अर्धापुर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर ह्यानी कोरोनाच्या धर्तीवर उपाययोजना म्हणून अर्धापूर शहरात शूष्म जिवाणू रोधक औषध फवारणी चालू केली असून स्वच्छता जोरात चालू झाली आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारची वैयक्तिक संरक्षक उपकरने देण्यात आलेली दिसून येत नाही.

काम करत असलेले कर्मचारी हे सुद्धा मानव असून ह्या रोगाने कोणासही सोडलेले नाही. फवारणी औषधात सुद्धा घातक रसायने असतात व त्याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्याच्या शरीरावर होण्याची शंका नाकारता येत नाही. म्हणून, प्रशासनाने ह्या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत कार्यवाही करावी.AM News Developed by Kalavati Technologies