अबब!एका खड्ड्यावर वीस हजार रुपये खर्च , खड्डा मात्र आहे तसाच

जागरूक नागरिक मंचाकडून मानवी साखळी तयार करून निषेध

कल्याण । कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र शहरातील रस्त्यांवर खड्डे अजूनही बुजवलेले नाहीत. याच्या निषेर्धात जागरूक नागरिक मंचाने आज मानवी साखळी तयार करून एक आगळे वेगळे आंदोलन केले.

जागरूक नागरिक मंचाच्या वतीने महापालिकेत अनेक प्रश्नावर पाठपुरावा केला जातो, मात्र कोणत्याही प्रकारे ठोस उत्तर महापालिकेकडून दिले जात नाहीत. महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी 17 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान महापालिकेने मे महिन्यापासून आत्तापर्यंत 5823 खड्डे बुजवण्याचा दावा केला आहे. तसेच 17 कोटी पैकी या कामावर बारा कोटी रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे. जागरूक नागरिक मंचाने या खर्चाचा सरासरी हिशोब लावत एका खड्यावर वीस हजार रुपये खर्च झाले कसे असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र काही भागात रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवले गेले नाहीत. महापालिकेच्या निषेधार्थ आज कल्याण मधील मोहम्मद अली चौक ते शिवजी चौक पर्यंत मानवी साखळी तयार करून निषेध व्यक्त केला.



AM News Developed by Kalavati Technologies