स्थलांतरित कामगारांना उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन भिवंडीतून रवाना

यावेळी प्रवाशांनी सरकार, प्रशासन व पोलिसांचे कौतुक करत आभार मानले.

भिवंडी | लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासुन राज्यात अडकलेल्या मजुर व नागरिकांना आपल्या राज्यात व आपल्या मूळगावी जाता यावं यासाठी सरकारने परवानगी दिली. यानंतर रात्री 12 वाजुन 57 मिनिटाला भिवंडी येथुन पहिली भिवंडी-गोरखपूर अशी विशेष श्रमिक एकक्सप्रेस सोडण्यात आली. या एक्सप्रेस मधुन 1 हजार 104 प्रवाशांची रवानगी आपल्या राज्यात करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व पोलीस प्रशासनाच्या उपस्थित या सर्व नागरिकांची रवानगी आपल्या राज्यात करण्यात आली आहे. यावेळी सर्व प्रवाश्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान पाहायला मिळालं.

लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुर व नागरिकांना आपल्या गावी, आपल्या राज्यात जाण्यासाठी सरकारने परवानगी देताच भिवंडी मधील सर्व पोलीस ठाण्यात आपली नोंद करण्यासाठी परराज्यातील नागरिकांनी दुपारपासूनच एकच गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्वांच्या राहत्या घराची पडताळणी करुन तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिली. रात्री १२:५७ च्या भिवंडी-गोरखपूर या विशेष श्रमिक एक्सप्रेसने या सर्व मजुर व नागरिकांची रवानगी करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस अधिकारी,पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत या नागरिकांना आपल्या राज्यात रवाना करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान पाहायला मिळालं.

यावेळी प्रवाशांनी सरकार, प्रशासन व पोलिसांचे कौतुक करत आभार मानले. तर यासाठी प्रशासन आणि पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली. या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना जेवणाची पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भिवंडीतील कुंभारवाडा,शांतीनगर, नारपोली,कोणगाव या ठिकाणच्या प्रवाश्यांचा या एक्सप्रेसमध्ये मोठा सहभाग आहे. रेल्वेने इतर राज्यात जाण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध केली आहे. त्याप्रमाणे माहिती घेऊन त्यांच्या याद्या बनवण्याच काम सुरु आहे. पोलीस स्टेशन जास्त गर्दी न करता ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु आहे. त्याचा देखील वापर करुन प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य कराव असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies