लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल - प्रविण दरेकर

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई | मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. आज जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्‍त व्हावा यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहे. सत्ताधारी पक्षासोबतही विरोधक यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला अधिक महत्व हवं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच शिक्षणासोबत सर्व क्षेत्रात मराठी भाषेला आम्ही प्राधान्य मिळवून देऊ असंही  प्रविण दरेकर यांनी म्हंटल आहे.AM News Developed by Kalavati Technologies