सोनई हत्याकांड : चार आरोपींची फाशी हायकोर्टाकडून कायम, एकाची सुटका!

या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं

अहमदनगर । 2013 साली माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि क्रूरतेची सीमा ओलांडणाऱ्या नगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी उच्च न्यायालयाने चार प्रमुख आरोपींची फाशी कायम केली असून एका आरोपीची फाशी रद्द करताना त्याला सर्व शिक्षेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाच्या उच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर हत्या प्रकरणात सतत पाठपुरावा करणाऱ्या आणि पीडित कुटुंबा पाठीशी राहणाऱ्या मेहतर-वाल्मिकी समाजातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या बाबत बोलताना समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आणि कांग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दीप चव्हाण यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना मृत कुटुंबियांना न्याय मिळाल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी हत्याझालेल्या तरुणांचे कुटुंब जिल्ह्यातून घाबरून परागंदा झाले. मात्र मेहतर-वाल्मिकी समाजाने राज्यभर आंदोलने करत हे प्रकरण लावून धरले होते.

जिल्हयातील नेवासेजवळ सोनई गावात 2013 साली घडलेले तिहेरी हत्याकांड हे सोनई हत्याकांड या नावाने ओळखले जाते. सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण केल्यामुळे सचिन घारू (वय 23), आणि त्याचे दोन मित्र संदीप राज थनवार (वय 24) व राहुल कंडारे (वय 26) या तीन दलित मेहतर तरुणांची सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे 1 जानेवारी 2003 रोजी अमानुषपणे हत्या करण्यात आली.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. 'आरोपींचे कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने त्यांनी पीडितांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. हे कृत्य खूपच निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला होता.

तिहेरी हत्याकांडातील दोषी रमेश विश्वनाथ दरंदले (वय 39), प्रकाश विश्वनाथ दरंदले (34), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (48), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (19) सर्व राहणार गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा, अशोक सुधाकर नवगिरे (28) व संदीप माधव कुऱ्हे (वय 33) राहणार खरवंडी, ता. नेवासा या सात आरोपींपैकी सहा आरोपींना 18 जानेवारी 2018 रोजी नाशिक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे’ अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात म्हंटले होते. प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर आज त्यावर न्यायालयाने निर्णय देत चार आरोपींची फाशी कायम ठेवली आहे.AM News Developed by Kalavati Technologies