अबब... सासुरवाडीत आलेला जावई कोरोना पॉझिटिव्ह; संपुर्ण गाव सील

सासुरवाडीत गहु घेण्यासाठी आला होता

औरंगाबाद | गंगापूर तालुक्यातील मालुंजा गावात पाहुणा म्हणून आलेला जावई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहर हद्यीतील गुलमंडी परिसरात राहणारा व भाजीविक्रीचा धंदा करणारा एक व्यक्ती हा गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथील आपल्या सासुरवाडीत गहु घेण्यासाठी आला होता. सदरील व्यक्ती सासुरवाडीत आल्यानंतर चहा-पाणी व जेवण झाल्यानंतर त्यास श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं उपचारासाठी त्यास तातडीनं गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतांना सदरील व्यक्तीचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा आज अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व इतर नातेवाईकांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून इतर लोकांचा शोध घेणं सुरू आहे. तसेच रुग्णाचे नातेवाईक राहत असलेला मालुंजा परिसर गंगापूर पोलिसांनी पुर्ण परिसर सील केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies