हेल्मेट सक्तीला सोलापूरकरांचा सकारात्मक प्रतिसाद

समजावून सांगितले जाईल नाही ऐकले तर सक्ती केली जाणार, तिथे तडजोड नाही अशी ठाम भूमिकाही कडुकर यांनी मांडली

सोलापूर | शहरात करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हा प्रतिसाद शंभर टक्क्यापर्यंत जावा, शंभर टक्के हेल्मेट वापरणारे शहर म्हणून सोलापूर महाराष्ट्रात नव्हेतर देशात गणले जावे असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी केले.

 सोलापूर शहरात 1 नोव्हेंबर 2019 पासून सीट बेल्ट, ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह, ट्रिपल सीट मोबाईलवर बोलणे, हेल्मेटचा वापर याबाबत पोलिसानी कडक भूमिका घेतली आहे. विशेषतः हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. हेल्मेट सक्ती नसून प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराने दिलेले पूर्ण आयुष्य जगावे. यासाठी अट्टहास असल्याचे सांगून नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद शंभर टक्क्यापर्यंत जावा शंभर टक्के हेल्मेट वापरणारे शहर म्हणून सोलापूरचे नाव देशात गणले जावे, असे प्रतिपादन सोलापूर शहर वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडुकर यांनी केले. हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती केली जाईल. मात्र, त्यामध्ये कुठलीही शिथिलता येणार नाही. समजावून सांगितले जाईल नाही ऐकले तर सक्ती केली जाणार, तिथे तडजोड नाही अशी ठाम भूमिकाही कडुकर यांनी मांडली. त्याच बरोबर पत्नीने पतीला बहिणीने भावाला मुलांनी वडिलांना हेल्मेट भेट द्यावे. जेणे करून हेल्मेट वापरण्याबाबत भावनिक विश्व निर्माण होईल आणि आपल्या माणसाची काळजी घेतली जाईल असे आवाहन पोलीस उपायुक  डॉक्टर वैशाली कडुकर यांनी केले आहे AM News Developed by Kalavati Technologies