सोलापूर । ...म्हणून महिलेनं केली चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना.

सोलापूर । पती सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलासह घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील भोसे या गावात घडली. विवाहित महिलेने मुलांसह घरगुती किरकोळ वादातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कचरेवाडी शिवारातील शेतकरी सुरेश कट्टे यांच्या शेतात पप्पू मोरे व विश्रांती मोरे हे दांपत्य गेल्या चार वर्षापासून शेतात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात कारणावरून घरात पती-पत्नीची भांडणे झाली. वारंवार होणारे भांडण आणि नवऱ्याची शिवीगाळ याचा विश्रांतीला कंटाळा आला होता. तोच संताप तिच्या डोक्यात राहिला व त्यातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला. त्या रागाच्या भरात रात्री दोन वाजता विश्रांतीने (वय 25) लहान मुलगा प्रतिक (वय दीड वर्ष) याला सोबत घेऊन तिचे घर हे शेतातल्या विहिरी जवळ होतं. विहीर खोल होती. त्या विहिरीमध्ये तब्बल चाळीस फूट पाणी होतं.

त्याच विहिरीत विश्रांतीने चिमुकल्यासह उडी टाकून आत्महत्या केली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्यात दोघांचाही मृत्यू झाला. सकाळी या घटनेची माहिती मिळाली आणि एकच खळबळ उडाली. पाणी खोल असल्याने तो मृतदेह बाहेर काढण्यास वेळ लागला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून चौकशी सुरू केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies