सोलापूरात पुन्हा 193 जणांना कोरोनाची बाधा, रुग्णसंख्या पोहोचली 9 हजार 240 वर

सध्या जिल्ह्यात 3125 रुग्णांवर उपचार सुरू असुन, 5 हजार 601 रुग्णांची कोरोनावर यशस्वीपणे मात

सोलापूर । सोलापूरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, सोलापूरकरांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 193 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 9 हजार 240 वर पोहोचली आहे. 5 हजार 601 जणांनी कोरोनावर मात केली असुन, सध्या 3152 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत उपचारादरम्यान 487 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies