सोशल मीडिया अकाउंट्स आधारशी लिंक व्हावे की नाही? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

आधार जोडून सोशल मीडियावरील डुप्लिकेट, बनावट अकाउंट्सवर नियंत्रण येईल, याचिकाकर्त्यांना विश्वास

नवी दिल्ली । सोशल मीडिया अकाउंटला आधार कार्डाशी जोडण्याच्या खटल्याची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि वकील अश्वनीकुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, आधारमधून सोशल मीडिया अकाउंट्स जोडून डुप्लिकेट, बनावट आणि घोस्ट अकाउंट्सवर नियंत्रण आणता येईल.

यासह याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाला बनावट बातम्या व पेड न्यूजवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडून सूचना देण्यास सांगितले आहे. यापूर्वी फेसबुक, ट्विटरसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधार जोडण्याशी संबंधित सुनावणीच्या वेळी कोर्टाने म्हटले आहे की, सरकार सोशल मीडियाच्या लिंकसंदर्भात मार्गदर्शक सूचना आणत असल्याचे आपण ऐकले आहे. हे फार महत्त्वाचे आहे, परंतु गोपनीयतेचीही काळजी घेतली पाहिजे. इंटरनेट वाइल्ड वेस्टसारखे आहे.

न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली होती. न्यायमूर्ती गुप्ता म्हणाले होते की, कोर्टासह सरकार आणि आयटी विभागानेही याकडे लक्ष देऊन समस्येवर तोडगा काढला पाहिजे. यावर अ‍ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल म्हणाले की, आयआयटी तज्ज्ञांचे तांत्रिक मतही घेण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies