...म्हणून सोशल मीडियावर 'दीपिका'ने बदलले आपले नाव

अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपले सोशल मीडियावरील नाव बदलले असून, तिने आता दीपिका ऐवजी शांतीप्रिया असे नाव टाकले आहे

मुंबई । शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा 2007 साली प्रदर्शित झालेला ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यामुळे तिच्या करिअरमधील हा महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. अलिकडेच या चित्रपटाला 13 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटचं नाव बदललं आहे.

‘ओम शांती ओम’ या चित्रपटात दीपिकाने 'शांतीप्रिया' अशी भूमिका साकारली होती. आता तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचं नाव रिनेम करून ओम शांती ओम मधील 'शांतीप्रिया' असे ठेवले असून, प्रोफाईल फोटो सुद्धा बदलला आहे. दीपिकाने ओम शांती ओम मधील शाहरूख खान सोबतचा फोटो ठेवला आहे.

...म्हणून सोशल मीडियावर 'दीपिका'ने बदलले आपले नावAM News Developed by Kalavati Technologies