चिंता आणखी वाढली! देशात गेल्या 24 तासात 52 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, 803 जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत 12 लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे

नवी दिल्ली | देशभरात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 52 हजार 050 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 18 लाख 55 हजार 746 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 12 लाख 30 हजार 510 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाद्वारे देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसाला 50 हजारांपेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान गेल्या चोवीस तासांमध्ये देशात 52 हजार 050 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून याच कालावधीत 803 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं साडेअठरा लाखांचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 12 लाख 30 हजार 510 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीला देशात 5 लाख 86 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 38 हजार 938 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies