प्रेमविवाह केल्याने वनवास होतो - सिंधुताई सपकाळ

जिल्ह्यातील कोळसा येथील खंडोबाच्या यात्रेत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे व्यख्यान आयोजित करण्यात आले.

हिंगोली | खंडोबा यात्रेत पहिल्यांदाच सिंधुताई यांचे व्यख्यान आयोजित केल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक सिंधुताई यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आले होते. यावेळी सिंधुताई म्हणाल्या की मुलींनी मनमानी करू नये, कुठलाही प्रेम विवाह यश्यस्वी होत नाही. प्रेमविवाह केल्याने वनवास होतो. आई-वडील तुटतात सासू सासरे तर नसतातच. ज्या आई वडिलांनी मोठं करण्यासाठी कष्ट केले त्यांचा विचार करावा. मात्र जर सगळं व्यवस्थित असेल तर पालकांनी सुद्धा मुलींचं लग्न लावून द्यायला पाहिजे. अशी भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील कोळसा येथील खंडोबाच्या यात्रेत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे व्यख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी भास्करराव रामराव बेंगाळ, माजी आमदार रामराव वडकुते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला भास्करराव रामराव बेंगाळ यांनी सिंधुताई सपकाळ यांचा स्वागत केलं.AM News Developed by Kalavati Technologies