सलमान खानला जीवे मारण्यासाठी 30 लाखांची सुपारी, शार्प शूटरने दिली कबुली

शक्ती नायडू या गँगच्या शार्प शूटरने हा खळबळजणक खुलासा केला.

मेरठ | बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्यासाठी 30 लाखांची सुपारी दिल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊन्टरमध्ये शक्ती नायडू या गँगच्या शार्प शूटरने हा खळबळजणक खुलासा केला. रवी भूरा असे त्याचे नाव आहे. जानेवारी 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात हजर झालेल्या सलमानला संपवण्यात येणार होते. असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे.

गेल्या आठवड्यात कंकरखेडामध्ये दीड लाखांचा इनाम असलेल्या शिव शक्ती नायडू येथे एन्काऊन्टरमध्ये करण्यात आला. मात्र त्याचा साथीदार रवी मलिक उर्फ भूरा तेथून निसटला. रवी हा मुझफ्फरनगरच्या रायशी येथे राहतो. मात्र, तो आता दिल्लीमध्ये राहत होता. तो शुक्रवारी पुष्प विहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी घेराव घालताच तो रेल्वे रोडच्या दिशेने पळत जात होता. दरम्यान पोलिसांवर त्याच्या माणसांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात रवीच्या पायाला गोळी लागली. मात्र, त्याच्यासोबतचे साथीदार पिंटू बंगाली आणि नितीन सैदपुरिया पळून गेले. रवी जखमी झाल्याने पोलिसांच्या हाती लागला. यावेळी त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies