धुळे जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार, कोरोना ग्रस्त मयताची पत्नी...

त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाची चूक लक्षात आली आणि...

धुळे : धुळे जिल्हा रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह मृत व्यक्तीच्या पत्नीचा गेल्या पाच दिवसापासून स्वब न घेतल्यामुळे अखेर पायी सुमारे 70 किलोमीटर धुळे ते शिरपूर व सूतगिरणी पर्यंत पायी चालत आल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की 22 तारखेला भाटपुरा येथील एका इसमाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

हा इसम आधी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेला होता. त्याचे स्वॅप घेण्यात आले होते त्याला दवाखान्यांमध्ये भरती न करता घरी सोडून देण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाची चूक लक्षात आली आणि तातडीने त्याला ॲम्बुलन्स पाठवून धुळे जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. तेथे ही प्रशासनाने फार मोठी चूक केली ती म्हणजे पतीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असताना त्याच्या सोबत त्याच्या पत्नीला कोणतीही मास किंवा कोणतेही सुरक्षा किट केव्हा कोणतीही खबरदारी न घेता तसेच गाडीत बसवून धुळे जिल्हा रुग्णालय पाठवले गेले.

त्या भाटपुरा येथील कोरोनाग्रस्तांचा दिनांक 25 मे रोजी मृत्यू झाला. त्याचे काही नातेवाईक यांचे धुळे येथे स्याब घेण्यात आले होते. त्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना सोडण्यात आले. पण त्या कोरोनाग्रस्तांची पत्नी तेथेच बसून होती तिची कोणतीही चाचणी घेण्यात आली नाही. आणि ती कोरोनाग्रस्तांची पत्नी आज सकाळी नऊ वाजता धुळे येथून 43 ,44 डिग्री सेल्सिअस तापमानात पायपीट करत शिरपूर ते शिरपूर सूतगिरणी 70 किलोमीटर अंतर कापत पायी आली.तिच्याजवळ फक्त एक फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी देण्यात आलेली होती. शोध घेणाऱ्या नातेवाईकांना ती कोरोनाग्रस्तांची पत्नी मिळाली. गावातील सरपंच शैलेंद्र चौधरी ग्रामस्थ, तहसीलदार आबा महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, थाळनेर चे पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे कर्मचारी दाखल झाले आहेत. आता त्या महिलेला बीड सेंटर शिंगावे याठिकाणी रुग्णवाहिकेला रवाना करण्यात आले आहेAM News Developed by Kalavati Technologies