धक्कादायक! टिटवाळा रेल्वे रुळाजवळ आढळला, कॉक्स अ‍ॅण्ड कंपनीतील सीएचा मृतदेह

कंपनीच्या करोडो रुपयांच्या घोटल्यानंतर कंपनीच्या सीएचा मृतदेह आढल्याने, हत्या की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे

मुंबई । एका मोठ्या कंपनीच्या सीए (चार्टर्ड अकाउंटंटचा) मृतदेह संशयास्पद टिटवाळा येथे रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने, सर्वत्र खऴबळ माजली आहे. सागर देशपांडे असे या सीएचे नाव असून, मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत तपास सुरु असताना कॉक्स अ‍ॅण्ड किंग आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपनीत करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी कंपनीत सीए पदावर कार्यरत असलेल्या सागर यांना गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी 13 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता.

मात्र 11 ऑक्टोबरपासून सागर बेपत्ता झाला होता. सागर यांनी आत्महत्या केली आहे, की त्यांच्यासोबत घातपात झाला आहे. याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. कल्याणजवळच्या टिटवाळ्यात 12 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरु केला. सदर मृतदेहाची ओळख पटण्यासाठी त्याचे फोटो राज्यभरात पाठविण्यात आले. अखेर त्या व्यक्तीची ओळख पटली. हा व्यक्ती 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता.

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात या व्यक्तीची मिसिंगची रिपोर्ट दाखल आहे. नातेवाईक सहा दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. सागर सुहास देशपांडे असे या व्यक्तीचे नाव आहे. सागर हे कॉक्स अ‍ॅण्ड किंग कंपनीत सीएचे काम पाहत होता. सागर हे कार्यरत असलेल्या कंपनीचा करोडो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सागर यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर नक्की त्यांची हत्या झाली की आत्महत्या हे गूढ वाढले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरू केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies