धक्कादायक! अकोल्यात जमिनीच्या वादातून शिक्षकाची निर्घृण हत्या

अकोल्यातील बार्शीटाकळी येथे प्लॉट खरेदीच्या कारणावरून, एका शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे

अकोला । बार्शीटाकळी येथील रहिवासी तथा व्यवसायाने शिक्षक असलेल्या जुबेर अहेमद खान शफाकत उल्ला खान यांच्यावर फिरदोस कॉलनी येथील दोन युवकांनी धारदार शस्त्राने कान्हेरीनजीक गुरुवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जुबेर अहेमद खान शफाखत उल्ला खान यांच्याशी प्लॉट खरेदीच्या कारणावरून फिरदोस कॉलनी येथील रहिवासी मोहम्मद हारून अब्दुल रहेमान यांचे मुले मोहम्मद जुबेर व दुसरा मुलगा मोहम्मद उमेर यांचा वाद सुरु आहे.

याच वादातून गुरुवारी सायंकाळी मोहम्मद हारुण अब्दुल रहेमान याचा मुलगा मोहम्मद उमेर आणि मोहम्मद जुबेर या दोघांनी शिक्षकावर धारदार शस्त्रांनी कान्हेरी सरप नजीक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुबेरबी अहमद खान यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांचा रात्री आठ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies