पुणे । पिंपरी-चिंचवड मधील भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर विवाहित नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे अल्पवयीन मुलीला आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, दोरीने हात पाय आणि ओढणीने तोंड बांधून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी एका 29 वर्षीय नराधमाविरोधात भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत. जानेवारी महिन्यात सात तारखेला अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे कामावर गेले असता आरोपीने अल्पवयीन मुलीला राहत्या घराच्या टेरेसवर बळजबरीने घेऊन गेला. तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारनार, अशी धमकी दिली आणि ओढणीने तोंड बांधून आणि दोरीने हात पाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.