धक्कादायक! नागपुरात कोरोनामुळे दोन पोलिसांचा मृत्यू

नागपुरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने पोलीस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर | शहर पोलीस दलात सेवा देत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धंतोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५० वर्षीय पोलीस शिपाई सिद्धार्थ सहारे आणि पोलीस मुख्यालयात सहाय्य पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले ५४ वर्षीय भगवान शेजुळ यांचा समावेश आहे. भगवान शेजुळ यांना निमोनिया झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सिद्धार्थ सहारे यांना काल संध्याकाळी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुगणालायत दाखल करताच त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. गेल्या पाच महिन्यात नागपुरातील सुमारे २५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र आज सकाळी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने पोलीस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies