धक्कादायक! शेतात काम करण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू

नांदेडमधील उमरी तालुक्यात गाईला वाचवण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिर पडून मृत्यू झाला आहे

नांदेड । शेतात काम करण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा त्यांच्याच शेतात असलेल्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिरोना (ता. उमरी) शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिरोना गावावर शोककळा पसरली आहे. उमरी तालुक्यातील जिरोना येथील ग्रामपंचायत सदस्या सुनंदा साहेबराव चुनूकवाड (वय ४०) ह्या आपली मुलगी कविता वय ( २०) हिला सोबत घेऊन शनिवारी शेतावर गेल्या होत्या.

त्या दोघीही शेतात काम करत असताना बांधावर चरत असलेली गाय तुंडूंब भरलेल्या विहिरीकडे जात होती. विहिर जमिनीबरोबर असल्याने त्यात गाय पडेल म्हणून, तिला हाकलण्यासाठी कविता ही धावत विहिरीकडे गेली. मात्र तोल गेल्याने ती विहिरीत पडली. विहिरीत पडल्याचा आवाज तिच्या आईला आला. यावेळी तिनेही धाव घेतली. पाण्यात बुडणाऱ्या आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आईनेही विहिरीत उडी घेतली.

मात्र या घटनेत त्या दोघीचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात गेलेल्या मायलेकी घरी का परत येत नाही त्यामुळे घरांनी शेताकडे धाव घेतली असता; दोघीही माय-लेकीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगत होता. रात्री उशिरा दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनंदा यांच्या पश्‍चात पती साहेबराव अचनुकवाड, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.AM News Developed by Kalavati Technologies