धक्कादायक! विवाहितीने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्यासोबत, विहिरीत उडी मारून केली आत्महत्या..

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

यवतमाळ । यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील म्हेसदोडका या गावातील एका विवाहित महिलेनी आपल्या दोन वर्षीय चिमुकल्यासोबत विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 2 वाजता घडली आहे. या घटनेने गावात दुखाचे डोंगर कोसळले आहे. दरम्यान या महिलेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.

हेही वाचा : धक्कादायक..! वर्ध्यात अवघ्या सात वर्षाच्या चिमूकलीवर अत्याचारAM News Developed by Kalavati Technologies