धक्कादायक..! वर्ध्यात प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

शेतातील विहिरीत उडी मारून दोघांनीही संपवली जीवनयात्रा; आत्महत्येचा कारण अस्पष्ट..

वर्धा । प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धेच्या गुंजखेडा परिसरात घडली आहे. रवी नानाजी कात्रे (वय 23) तर वृषाली मारोती मुसळे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या युगुलाचे नाव आहे. दोन्ही गुंजखेडा येथील रहिवासी असून मंगळवार पासून दोघेही बेपत्ता होते. शुक्रवारी संध्याकाळी परिसरातील एकनाथ ब्राह्मणकर यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह दिसला त्यानंतर, परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या दोघांचे मागील अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. या दोघांनी आत्महत्या का केली याचा कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरवात केली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.AM News Developed by Kalavati Technologies