धक्कादायक! नांदगावात एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

हत्येचे कारण अस्पष्ट; नांदगाव तालुक्यात भितीचे वातावरण

नांदगाव । नांदगाव तालुक्यातील वाखारी ता. नांदगाव जवळील जेउर रस्त्याच्या लगत कुटुंबातील पती, पत्नी व दोन लहान मुलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या हत्याकांडामुळे संपुर्ण नांदगाव तालुका हादरला आहे. समाधान आण्णा चव्हाण ( वय 37 ) भरताबाई चव्हाण ( वय 32 ) गणेश समाधान ( वय 6 ) आरोही समाधान चव्हाण ( वय 4 ) अशा एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली आहे. आज पहाटेच रिक्षा चालक समाधान चव्हाण त्याची पत्नी मुलगा, मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून, घटनेचा अधिक तपास करीत आहेत. सर्वसाधारण कुटुंबातील चौघे रात्री शेतात घरातल्या ओसरीत झोपलेले होते. रक्ताच्या थारोळ्यात चौघांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. समाधान रिक्षा चालवित होता मात्र, लॉकडाऊनमुळे तोही बेरोजगार होता. पत्नी भरताबाई मोलमजुरी करीत असे. ही घटना कोणी केली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. ह्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies