धक्कादायक! औरंगाबादेत कोरोनाबाधित तरुणाने, घाटीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून केली आत्महत्या

औरंगाबादेतील घाटी रुग्णालय एका युवकाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे

औरंगाबाद । औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय अर्थात घाटीत एका कोरोनाग्रस्त तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. काकासाहेब कणसे असे मयत तरुणाचे नाव असून तो पैठण तालुक्यातील धनगाव येथील रहिवासी आहे. काही दिवसांपुर्वी काकासाहेब कणसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांनी अचानक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काकासाहेब कणसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होते. या दुर्दैवी घटनेमुळे पैठण तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies