धक्कादायक! कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा

सांगलीतील मिरज येथे कोविड सेंटरमध्ये एका 55 वर्षीय रुग्णाने, स्वत:चा गळा कापत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

सांगली । सांगली जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधित रुग्णांने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरज-मालगाव रस्त्यावरील अमननगर येथे राहणार्‍या हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55) यांना कोरोनाची लागण झाल्याची झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दहा दिवसांपूर्वी मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परंतु मध्यरात्री त्यांनी चाकूने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली आहे. अशी मोमीन यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. आत्महत्येबाबत, मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मोमीन यांनी नेमकी कोणत्या कारणावरून, आत्महत्या केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान मोमीन यांच्यावर सोमवारी दुपारी मिरज कोविड रुग्णालयात शवविच्छेन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : धक्कादायक! औरंगाबादेत कोरोनाबाधित तरुणाने, घाटीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून केली आत्महत्याAM News Developed by Kalavati Technologies