धक्कादायक..! वर्ध्यात अवघ्या सात वर्षाच्या चिमूकलीवर अत्याचार..

रात्रीच्या सुमारास घरातून उचलून बाजूच्या नर्सरीत; आळी-पाळीने केला चिमुकलीवर अत्याचार

वर्धा । वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील इंझाळा परिसरात पारधी पाड्यावर एका सात वर्षाच्या चिमूकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास पीडित चिमुकली आपल्या आईसोबत खाटावर झोपली होती. दरम्यान आरोपीने त्याच्या दोन साथीदाराच्या मदतीने चिमूकलीला खाटावरून उचलून बाजूच्या नर्सरीत नेले व आळीपाळीने त्या चिमुकलीवर अत्याचार केला. व नंतर तिला घरासमोर सोडून दिले. दरम्यान रात्रीच्या सुमारास पिडीत चिमुकली रडत असल्याने आईने विचारपूस केली असता, त्या मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. दरम्यान या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies