धक्कादायक! हाथरसनंतर आता बक्सरमध्ये एका दलित महिलेवर सामुहिक बलात्कार, नराधमांनी पीडितेच्या 5 वर्षाच्या मुलाचीही केली हत्या

बिहारच्या बक्सरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आले असून, आरोपींनी पीडितेच्या मुलांची गळा दाबून हत्या केली आहे

पाटणा । बिहारच्या बक्सरमध्ये पुन्हा हाथरससारखी धक्कादायक घटना घडली आहे. नराधमांनी एका दलित महिलेवर सामुहिक बलात्कार केला असून, त्यानंतर त्या महिलेच्या मुलाचा खुन करून विहीर फेकून दिल्याची घटना घडली आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. पीडितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार सदरील नराधमांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सध्या पीडितेची प्रकृती खालावली असून, पोलीसांना मेडिकल रिपोर्ट येण्याची प्रतिक्षा आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बक्सरमध्ये नराधमांनी महिलेवर सामुहिक बलात्कार केला असून, पीडितेच्या पाच वर्षाच्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह विहीरीत फेकण्यात आला आहे. बक्सरमधील सदर रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू असून, सात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

शनिवारी पीडित महिला बॅंकेत आपल्या मुलासोबत जात असताना, त्यादरम्यान नराधमांनी तिला आणि तिच्या मुलाला रस्त्यावरून पकडून, बाजुला नेत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या मुलांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर नराधमांनी पीडितेला आणि तिच्या मुलाला विहीरीत फेकून, तेथून पळ काढला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने त्या पीडितेचे जीव वाचले असून, मात्र त्या पीडितेच्या मुलांचे मृत्यू झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.AM News Developed by Kalavati Technologies