धक्कादायक! कोरोना रुग्णांसह आता मृतदेहाचीही परवड

डोंबिवली स्मशानभूमीतील गॅस दाहीनी बंद असल्याने, जेष्ठ पत्रकारच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गाठावे लागले कल्याण

कल्याण । एकीकडे कोरोना रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका तसेच हॉस्पिटल मिळत नाहीत. तर डोंबिवलीत आता अंत्यसंस्कारसाठी स्मशानभूमी मिळत नाही नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. परंतु मृतदेह दहनसाठी लागणारे 2 तास आणि मेंटेनन्स प्राब्लेममुळे असे प्रश्न उद्भवत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

डोंबिवलीमधील कोरोना रुग्णांची मृत्यूनंतर परवड सुरू आहे. कारण स्मशानभूमी बंद आहे. डोंबिवली मधील शिवमंदिर, पाथर्ली गॅस दाहीनी बंद असल्याने मृतदेहाच्या नातेवाईक त्रास सहन करावा लागला आहे. ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांचा मंगळवारी रात्री अकस्मात मृत्यू झाला. मात्र शिवमंदिर, पाथर्ली गॅस दाहीनी बंद असल्याने कोविड संशयित रुग्ण म्हणून त्यांच्यावर कल्याणमध्ये लालचौकी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कहर म्हणजे त्यांना सुरुवातीला ऑक्सिजन मिळाला नाही. तर पण अ‍ॅबुलन्स उशिराने आली, मृत्यूनंतर त्यांना डोंबिवली शहरातील स्मशानभूमीत जागा नसल्याने कल्याणमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. गॅस शववहिनी बंद असल्याने कल्याण डोंबिवलीकरांची शोकांतिका म्हणावी लागेल.

संपूर्ण कल्याण आणि डोंबिवलीत लालचौकी, बैलबाजार, विठ्ठलवाडी, पाथर्ली आणि शिवमंदिर आशा 5 ठिकाणी गॅस शवावाहिन्या आहेत. परंतु या कोरोनाच्या काळात येणाऱ्या कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांचे शव हे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले येतात. हे मृतदेह गॅस शववाहिनी मध्ये जाळले जातात. प्लॅस्टिक असल्यामुळे हे शव दहन होण्यासाठी 2 तासाच कालावधी लागतो तर प्लॅस्टिकमुळे बर्नर चॉकप झाल्याने मेंटेनन्सचा प्रश्न उद्भवतो. एका शवाला 2 तास लागत असल्याने साफसफाई करून दुसरा मृतदेह जाळण्यासाठी उशीर लागत असून उशीर लागत असल्याचे पालिका शहर अभियंता कोळी देवनपल्ली यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies