डोंबिवलीत धक्कादायक प्रकार! शास्त्रीनगर रुग्णालयातून पळालेला कोरोनाबाधित रुग्ण फुटपाथवर

कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

ठाणे । एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या रूग्णसंख्येमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डोंबिवली पश्चिम शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये फुटपाथावर कोरोनाबाधित रुग्ण झोपलेला असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. काही कालावधीनंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शास्त्रीनगर रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेत असलेला कोरोनाबधित एक रुग्ण हा काही दिवसांपूर्वी फरार झाला होता. याप्रकरणी पालिका प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली असल्याचे सांगितले. या रुग्णाचा शोध सुरू असताना त्या रुग्णाचा रस्त्यावर पडलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्थानिक नागरिकांनी या रुग्णाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर या रुग्णाचा शोध लागला. याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहासिनी बडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आयसीयूमध्ये सदर रुग्ण उपचार घेत होता. मात्र आयसीयू मध्ये 2 रुग्णाचा मृत्यू झाला होता. हे मृतदेह बाहेर काढण्यात रुग्णालय स्टाफ व्यस्त असल्याचा फायदा घेत हा रुग्ण पळून गेला. मात्र गर्दीत याची माहिती मिळण्यास उशीर झाला. सोशल मीडियावरून माहिती मिळताच त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे सांगितले. याप्रकरणी शास्त्रीनगर वैद्यकरी यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आरोग्य विभागाने मनात आणले तर कोरोना नियंत्रणात आणू शकतात मात्र त्यांची मानसिकता नाही, या कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूला केडीएमसी प्रशासन हेच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी निंबाळकर यांनी केला. आयुक्तांनी साथरोग प्रतिबंधक अधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना या घटनेस जबाबदार धरून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

तर याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुहासिनी बडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आयसीयू मध्ये सदर रुग्ण उपचार घेत होता मात्र आयसीयू मध्ये 2 रुग्णाचा मृत्यू झाला होता. हे मृतदेह बाहेर काढण्यात रुग्णालय स्टाफ व्यस्त असल्याचा फायदा घेत हा रुग्ण पळून गेला मात्र गर्दीत याची माहिती मिळण्यास उशीर झाला माहिती मिळताच त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे सांगत कॅमेऱ्या समोर बोलण्यास नकार दिला.AM News Developed by Kalavati Technologies