उत्तर प्रदेशात साधूंची हत्या, याचे राजकारण करु नका, संजय राऊतांचे आवाहन

पालघरमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन जमावाने हल्ला करत तिघांची हत्या केली होती

मुंबई | उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. गावातील मंदिरात या साधूंचे मृतदेह आढळले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पालघर घटनेचा उल्लेख करत या घटनेला धार्मिक रंग देऊ नका असे आवाहान केले आहे.

उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाली. या घटनेनंतर संजय राऊत यांनी त्यावर भाजपला टोले लगावले आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हे अत्यंत निघृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. तसंच ट्विटच राऊत यांनी केलं आहे.

यासोबतच संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'भयनाक ! उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आली. मी सर्वांना आवाहन करतो की याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका. ज्याप्रकारे काही लोकांनी पालघर प्रकरणात प्रयत्न केला होता'.

पालघरमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन जमावाने हल्ला करत तिघांची हत्या केली होती. यामधील दोन जण हे साधू होते. यानंतर अनेकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असा कोणताही संबंध नाही. याचं राजकारण केलं जाऊ नये अशी विनंती केली होती. सोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकही मुस्लीम नसल्याचं सांगत चुकीचे आरोप केले जात असल्याचं सांगितलं होतं.AM News Developed by Kalavati Technologies